*महाड येथील ट्रामा केअर सेंटर येथे शाॅर्ट सर्किटमुळे आग*
*महाड येथील ट्रामा केअर सेंटरची सुरक्षा रामभरोसे-नागरीकांना जीव मुठीत धरून करावा लागतो इलाज*
दि.१२ मार्च २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता महाड येथील शासकीय ट्रामा केअर सेंटर येथे शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असता एकच खळबळ उडाली आणि हाॅस्पिटल मधील पेशंट यांची पळापळ झाली आग आटोक्यात आणण्यासाठी महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला परंतु आग लागल्याचे कळताच तेथील स्टाफ व कर्मचारी यांनी त्वरित आग विझविण्याचा प्रयत्न केला म्हणून थोडक्यात लागलेली आग अग्निशमन बंब येण्याच्या आत विझवली गेली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती तसेच रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात त्यांना आरोग्य निरोगी होण्यासाठी स्वच्छता सुद्धा महत्वाचा विषय असताना कुठेतरी त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होताना दिसत आहे यापुर्वी सुद्धा अश्याप्रकारची आगीची घटना घडलेली होती परंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केला जातोय का की अशी घटना गांभीर्याने घेतली जात नाही हा मात्र प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.