उरण पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब, गरजू मुलांना दररोज एकवेळचे दुपारचे जेवण मोफत दिले जाते.सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांनी व त्यांच्या टीमने सुफल आहाराच्या माध्यमातून मोफत अन्नदान सुरु केले. ते आजही अखंडपणे सुरु आहे. अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमाला मदत करीत असतात. तर अनेक व्यक्ती आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तर काही व्यक्ती विविध सणांचे औचित्या साधून चारफाटा येथे सुफल आहाराच्या माध्यमातून अन्नदान करीत असतात.अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत उरण मधील पोलीस बांधवांनी आपल्या स्व खर्चातून झोपडपट्टी येथील मुलांना मोफत अन्नदान केले. सपोनि अनिरुद्ध गिजे, पोलीस नाईक -धीरज पाटील, पोलीस नाईक -युवराज जाधव, पोलीस नाईक -कातकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून अशा पोलीस बांधवांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे मत उरण मधील नागरिकांनी व्यक्त केले आहे.