बि पी सी एल युनिट च्या जनरल सेक्रेटरीपदी किरीट पाटील यांची बिनविरोध निवड.
उरण/प्रतिनिधी :
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीची बैठक तेल रसायन भवन, दादर ,मुबंई येथे संपन्न झाली. तेथे रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष व कामगार नेते तथा उरणचे सुपुत्र किरीट पाटील यांची पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या बि पी सी एल युनिटच्या जनरल सेक्रेटरीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गेली 32 वर्ष युनियन मध्ये युनिट सेक्रेटरीपदा पासुन ते डेप्युटी जनरल सेक्रेटरी पदापर्यंत त्यांनी काम केले आहे . ह्या दरम्यान कांडला, गुजरात ,मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील बि पि सी एल च्या युनिट मधील कामगारांना युनियनच्या माध्यमातुन न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे .किरीट पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जनरल सेक्रेटरीपदी बिनविरोध निवड झाली आहे.किरीट पाटील यांच्या निवडीचे सर्वच क्षेत्रातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कामगाराचे पश्न सोडविण्याबाबत कामगार नेते महेंद्र घरत यांचे किरीट पाटील यांना मार्गदर्शन मिळाले व महेंद्रशेठ घरत यांच्या सोबत राजकीय वाटचाल करतांना नुकताच किरीट पाटील यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी महेंद्रशेठ घरत यांनी निवड केली.यासाठीहि सर्व स्तरातून किरीट पाटील यांचे अभिनंदन होत आहे.