महिलांना सक्षम करण्याचे काम हॅप्पी सिंग व त्यांच्या पत्नी हरजिंदरकौर सिंग यांनी केले आहे – चित्रा वाघ
पनवेल / प्रतिनिधी
कामोठ्यासह पनवेल परिसरातील तळागळातील महिलांना एकत्रित करून त्यांना सक्षम करण्याचे काम हॅप्पी सिंग व त्यांच्या पत्नी हरजिंदरकौर सिंग यांनी विविध माध्यमातून केले असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी भारतीय जनता पार्टी कामोठे व वॅल्यू ऑफ स्माईल फाऊंडेशन आणि युवा मित्र मंडळ आयोजित रविवार दि.13 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिन निमित्ताने महिलांसाठी खेळ खेळू या पैठणीचा व हळदीकुंकू समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुण्या उपस्थित असताना केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह आ.प्रशांत ठाकूर भाजपा नेते हाजीअफरात शेख, महापौर कविता चौतमोल, उपमहापौर सिताताई पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, हॅप्पी सिंग, हरजिंदरकौर सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने कामोठे परिसरातील महिला वर्ग यावेळी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीय स्कूल मैदान, सेक्टर 6 ए, कामोठे येथे करण्यात आले होते. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यात आ.प्रशांत ठाकूर यांचे काम कौतुकास्पद असून त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी हा त्यांचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे पार पाडत असतो. हॅप्पी सिंग यांचे कार्य कामोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी हरजिंरकौर सिंग या विविध उपक्रम राबवित महिलांना सक्षम करीत असतात. कोरोना काळामध्ये या दोघांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला कुठलीही अडचण असल्यास तुम्ही या दोघांमध्ये धावत जा, आपले काम झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आ.प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा हॅप्पी सिंग यांच्या कार्याचे कौतुक करून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून हे पती-पत्नी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर अल्पसंख्यांक नेते हाजीअराफत शेख यांनी सुद्धा या दोघांचे कौतुक करून कामोठ्यामध्ये अशा प्रकारे कार्यक्रम राबवून त्यांनी जनतेने त्यांच्याबद्दल असलेले प्रेम त्यांना दाखवून दिले आहे. या दोघांनी कामोठेपुरते सिमीत न राहता आपले कार्य अजून पुढे वाढवावे व यासाठी आपण त्यांना सर्वतोपरी मदत करू असेही त्यांनी सांगितले.