*नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर अंतर्गत बेलपाडा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन*
पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकच्या कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 अंतर्गत बेलपाडा गाव येथील येथील विठ्ठल मंदिरात नुकतेच विशेष बाह्य आरेाग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय , बेलपाडा गावचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे, इतर नगरसेवक, मुख्य वैद्यकिय व आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी ,आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबीरात जनरल तपासणी, लहान मुलांची तपासणी, गरोदर स्त्रियांची तपासणी, किशोरवयीन मुलांमुलींची तपासणी, जेष्ठ नागरिकांची तपासणी, बीएमडी तपासणी, कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण, त्वचा रोग तज्ञ, स्त्री रोग ,रक्त तपासणी करण्यात आली. तसेच रूग्णांना औषधेही देण्यात आली. या शिबीरासाठी एमजीएम वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सचे सहकार्य मिळाले. जवळपास १३० लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबीरांसाठी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी डॉ.पद्मीनी बर्फे, डॉ.अनिल पाटील, डॉ. शुभम पाटील,डॉ. सदाफ लांजेकर, सर्व परिचारिका,वॉर्ड बॉय यांनी परिश्रम घेतले.