गुंजार पाटील यांच्या लेखनात उत्तम लेखनाची ताकद शिवव्याख्याते प्रशांत देशमुख.
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )
उरण,नवघर येथे गुंजार पाटील यांच्या “टाटा” आणि “अ प्रामिस इज अ प्रामिस “या दोन पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी देशमुख म्हणाले की गुंजार यांची दहा पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या लेखनाची ताकद उत्तम आहे.असे गौरवोदगार काढले.यावेळी उद्घाटन रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्ष संजय गुंजाळ होते. साहित्यिक ए.डी.पाटील, पत्रकार गणेश कोळी,डॉ. राजेंद्र राठोड,एडव्होकेट गोपाळ
शेळके,कवयित्री ज्योत्स्ना राजपूत, प्रा,आर.के.म्हात्रे, नाटककार मच्छिंद्र म्हात्रे, शाहीर मोरेश्वर म्हात्रे इ.साहित्यिक यावेळी उपस्थित होते.सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले.
लेखक गुंजार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की “टाटा या ग्रुपचं देशासाठी असलेले प्रचंड योगदान आणि गरिबांसाठी दिलेल्या वचनातून नॅनो कारची निर्मिती झाली आणि यामुळेच मी या इंग्रजी आणि मराठी या भाषांमध्ये हि पुस्तके प्रसिद्ध केली.”
प्रास्ताविक गंधार पाटील
यांनी केले.तर स्वागत रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी केले.आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.