भेंडखळ महोत्सव 2022 मोठया उत्साहात संपन्न.
उरण (सुनिल ठाकूर ).
श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ व फ्रेंड्स सामाजिक कलामंच भेंडखळ यांच्या विद्यमाने दिनांक 12,13 मार्च 2022 रोजी उरण तालुक्यातील भेंडखळ येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी भेंडखळ महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 12 मार्च रोजी श्री जरी मरी आई देवीचा अभिषेक, उदघाटन सोहळा, लेझिम नृत्य व स्वागत गीते, शालेय मुलांच्या स्पर्धा, मंगळागौर स्पर्धा व हळदी कुंकू, बेंजो वादन, पोवाडा -युवा शाहीर उमंग भोईर, अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा तर दिनांक 13 मार्च 2022 रोजी अनुभव प्रवासाचा, शालेय मुलांच्या स्पर्धा, प्रवचन -हभप सौ. सीमाताई ठाकूर, प्रेरक भाषण – सर्जंट प्रशांत भगत, नृत्य स्पर्धा, बक्षीस वितरण असे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दोन दिवस महिला वर्गासाठी दोन दिवस स्टॉलचे आयोजन केले होते. यामध्ये गावातील 11 महिला बचत गटांनी सहभाग घेऊन स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यप्रकार, कपडे, अगरबत्ती, कॉस्टेमॅटिक वस्तू, खेळणी विक्रीस ठेवल्या होत्या. ग्राहकांचा या स्टॉलला उत्कृष्ठ सहकार्य लागले. श्री विठोबा देवस्थान भेंडखळ, महिला मंडळ भेंडखळ, भेंडखळ क्रिकेट क्लब, रा.जि.प शाळा,भेंडखळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भेंडखळ यांच्या विशेष सहकार्याने भेंडखळ महोत्सव 2022 मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ व फ्रेंड्स सामाजिक कलामंच भेंडखळ यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत.