श्री वासुदेव सेवा मंडळ खोपोली यांच्या माध्यमातून राबवले गेले रक्तदान शिबिरास अन्य समाजोपयोगी उपक्रम.
श्री वासुदेव सेवा मंडळ खोपोली यांच्यावतीने तुकाराम बीज आणि भाऊ महाराज करंदीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे यंदा पाचव्या वर्षी रविवार दिनांक 20 मार्च 2022 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या संस्थेने स्वराज मित्र मंडळ – मोगल वाडी आणि समर्पण ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्याला भक्तगणांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच सोबत सॅलोम मतिमंद मुलांची शाळा – खोपोली येथे शैक्षणिक साहित्य आणि फर्निचरचे वाटप करण्यात आले.
श्री वासुदेव सेवा मंडळ – खोपोली, ही धर्मदाय संस्था नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असते, कोरोना काळात अन्नदानाच्या माध्यमातून स्थलांतरित मजूर, गोरगरीब आणि आदिवासी नागरिकांना मोलाची मदत केली होती. संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदानासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच परंपरेचा धागा पकडून यंदा सलग पाचव्या वर्षी संस्थेचे अध्यक्ष – किशोर ओसवाल, उपाध्यक्ष – दिलीप देशमुख, खजिनदार – लक्ष्मीकांत काटकर, सेक्रेटरी – सुशांत चौधरी आणि सदस्य – गणेश ओसवाल यांनी समाज हिताचे विवीध उपक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.