द्रोणागिरी शहर मनसे तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
उरण/प्रतिनिधी :
शिवजयंती हा महत्वाचा सण तिथिप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचे आदेश मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी दिले होते. त्याच आदेशाने पालन करत उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये द्रोणागिरी नोड मधील सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेतले. व लहान मुलांनी सहभागी होऊन शिव व्याख्यान तसेच पोवाडे व भाषणं केली.सर्व सहभागी होणाऱ्या सर्व लहान मुलांना सन्मानचिन्ह देऊन मनसे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत, निलेश कोर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी सुध्दा उपस्थित राहुन कार्यक्रमात सहभागी झाले. शिवजयंती साजरी करण्याचे आयोजन मनसे शाखा बोकडविरा व मनसे शाखा नविन शेवाचे सर्व पदाधिकारी यांनी केले.यामध्ये रितेश पाटील, हेमंत म्हात्रे, निलेश ठाकुर, दिपक सुतार, आर्यन घरत, ललिता म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरी केली.