स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी व एकतावादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने क्रांतीदिन जल्लोषात संपन्न
पनवेल,/प्रतिनिधी :एकतावादी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम तथा नानासाहेब इंदिसे व स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या नेतृत्वात महाड येथील चवदार तळे येथे क्रांतीदिनानिमित्त अभिवादन सभा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यात आले. चवदार तळ्याच्या पाण्याचे प्राशन करण्यात आले. तसेच अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी भीमगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. महाराष्ट्रातील प्रमुख भीमगीत गायिकांनी आपली गाणी येथे गायली व त्यातून बाबासाहेबांचे जीवन चरित्र सर्वांसमोर मांडण्यात आले. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नानासाहेब इंदिसे, भगवान गरुड, अमित हिरवे, विजय धोत्रे, मनोहर ओगले, बाळाराम जाधव, उत्तम खडसे, ताराताई राके, स्वाभिमानी व एकतावादी पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी व एकतावादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित सभेतील उपस्थित मान्यवर.