ओमकार माळीने पटकाविले जलतरण स्पर्धेत गोल्डमेडल
उरण /रायगड :
उरण तालुक्याचे सुपुत्र, करंजा सुरकीचा पाडा येथील रहिवाशी कु. ओमकार सदानंद कोळी यांनी स्नेहानगर, स्विमिंग पूल धुळे येथे झालेल्या 2 ऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत 100 मीटर,200 मीटर,400 मीटर फ्रीस्टाईल आणि 200 मीटर मिडले रिले,200 मीटर फ्री स्टाईल रिले यामध्ये 5 गोल्ड मेडल पटकाविले आहे.या कामगिरीमुळे महाराष्ट्र मधून केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावून ओमकार माळी यांनी उरणचे नाव सातासमुद्रा पलीकडे नेले आहे. गोल्ड मेडल मिळाल्याने ओमकार सदानंद माळी यांच्यावर विविध स्तरातून, विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मित्र परिवार, नातेवाईक, चाहत्यांनी त्याला प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी सोशल मीडिया द्वारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.