माणगांव तालुक्यात शिवजयंती सोहळा उत्साहात पार
माणगाव /रायगड :
किल्ले रायगड ते माणगांव अशा प्रकारची शिवज्योत मिरवणूक माणगांव तालुक्यातील शहर तसेच गावोगावी काढण्यात आली यावेळी प्रत्येक मावळा आनंदमय वातावरणात ढोल ताशे तसेच लेझीम पथकात बनाटी नृत्य करीत होता राजे शिव छत्रपती याच्या जयंती निमित्त प्रत्येक गावात शिवज्योत आणण्यात येते आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे.१९ फेब्रुवारी ही जन्म तारीख स्वीकारली असली तरी तिथीनुसार शिवभक्त फाल्गुन वध्य तृतीया दिवशी शिवजयंती साजरी करतात यंदा फाल्गु्न वध्य तृतीया ही २१ मार्च रोजी म्हणजे आज आहे. त्यामुळे आज राज्यभरात शिवजयंती उत्साह पाहायला मिळत आहे. माणगांव तालुक्यातील उतेखोल गावं, साई नगर, खादाड, माणगांव शहर लोणेरे, गोरेगाव, मुगवली, विचवली, होडगाव, साले, बोरघर तसेच अनेक गावा गावात शिवजयंती साजरी करण्यात येते यावेळी माणगांव नगरपंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार उपनगरध्यक्ष सचिन बोबले नगरसेवक, नगरसेविका यांनी माणगांव मध्ये येणाऱ्या सर्व शिवज्योत च स्वागत केले.