सरपंच रेश्मा ठाकूर राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
उरण /प्रतिनिधी :
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित पद्मश्री राहीबाई पोपेरे (बिजमाता)यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले. आज पर्यंत सरपंच म्हणून धुतूम गावात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असून कोरोना काळात मदत व त्या नंतर नागरिकांचे लसीकरण असे विविध सुविधा व कार्यक्रम सरपंच रेश्मा ठाकूर यांनी राबविले.त्यांच्या या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी माऊली सभागृह, सावेडी रोड, अहमदनगर येथे भव्य कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे (बिजमाता) यांच्या शुभस्ते फेटा बांधून, शाळ, सन्मानपत्र देऊन आदर्श सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला.या मिळालेल्या पुरस्कार बद्दल आनंद होत असून ग्रामस्थांचे प्रेम व आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या कामाची पोच पावती आहे तसेच आम्हाला सन्मानित केल्या बद्दल सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे आभार व्यक्त करतो असे मत सरपंच रेश्मा ठाकूर यांनी व्यक्त केले. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी उपसरपंच शरद ठाकूर, आधारस्तंभ युवा नेते श्यामभाई ठाकूर, सुनिल भाऊ ठाकूर यांच्या समवेत अहमदनगर येथे हजेरी लावली. तर संपूर्ण परिवार व मित्र परिवार आणि कार्यकर्ते यांनी फोन करून सरपंच रेश्मा ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.