चांभालीऀ- मोहोपाडा येथील सौ. उमाताई मुंढे यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदी निवड
चांभाली॑॑॑ -मोहोपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांची नुकतीच रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी मंत्री तथा खासदार सुनील तटकरे व कर्जत खालापूर चे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीपशेठ मुंढे यांच्या सुविद्य पत्नी उमा ताई मुंढे यांची बुधवारी मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये रायगड जिल्हाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोजी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते उमा मुंढे यांना रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचे पत्र देऊन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश भाऊलाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी मंडळी यावेळी उपस्थित होते.
सौ.उमाताई मुंढे यांनी २००८ मध्ये मोहोपाडा- वासांबे ग्रामपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्यांनी त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्या. निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामे केलीत. त्यानंतर वास आंबे जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनीरायगड जिल्हा परिषदेची निवडणुका लढवली आणि जिल्हा परिषद मध्येही ते प्रचंड मताधिक्क्याने निवडून आलेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी विविध विकास कामे करून लोकांची मने जिंकली हे काम करत असताना त्यांना रायगड जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण सभापती हे पद मिळाले. महिला बालकल्याण सभापती असताना विकास कामाबरोबरच उमाताई मुंढे यांनी गरीब, गरजू, अपंग, विधवा, निराधार अशा सर्वांनाच विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. शासनाच्या विविध योजना तळागळातील गोर, गरीब, दीनदुबळ्या समाजासाठी पोहोचाव्यात यासाठी त्या नेहमीच अग्रेसर व कटिबद्ध राहिल्यात. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्याविषयी नागरिकांच्या मनात अत्यंत त्यांच्या विषयी आदराचे व आपुलकीचे स्थान निर्माण झाले आहे. उमाताई मुंढे यांनी केलेल्या भरीव व यशस्वी कामा मुळेच त्यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उमाताई मुंढे यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयवंतराव पाटील, महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर,खा. सुनील तटकरे, पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेशभाऊ लाड, प्रतीक्षा ताई लाड, यांच्यासह विविध सामाजिक शैक्षणिक, राजकीय, पक्षाच्या तसेच रायगड जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.