राज्यातील 846 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती..
पनवेल /प्रतिनिधी
राज्यातील 846 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी ता.22 रोजी दिले आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 34 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे या बढती मिळालेल्या पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाकडून मंगळवारी पोलिस उपनिरीक्षकांच्या बढतीचे आदेश जारी करण्यात आले. राज्यभरातील विविध भागातील एकुण 846 जणांची पदोन्नती करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील निशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्व रिक्त पदे 25/5/2004 च्या स्थितीनुसार सेवाजेष्ठतेनुसार भरण्यात येत असून 25/5/2004 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या निशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना यांच्या मूळ सेवाजेष्ठतेनुसार निशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येत आहे. त्याचबरोबर या पदोन्नतीसाठी 20-21 ची निवड सूची तयार करण्यात आली होती. त्यानुसार 9/2/2022 रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पात्र ठरलेल्या निशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांपैकी 846 निशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना निशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आल्याचे आदेशात म्हंटले आहे. त्यानुसार राज्यातील ८४६ पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आले आहे. त्याच्याबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 34 पोलीस उपनिरीक्षकांचा सहभाग आहे. त्यामुळे मिळालेल्या बढतीमुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.