आर्य किशोर पाटील यांनी 5 तास 31 मिनिटात मांडवा ते गेट ऑफ इंडिया पोहून केले पार
उरण तालुक्यातील केगांव दांडा येथील रहिवाशी तथा उत्तम जलतरणपट्टू आर्य किशोर पाटील (वय वर्षे 10)इयत्ता 5 वी यांनी दिनांक 23/3/2022 रोजी मांडवा ते गेट ऑफ इंडिया हे 18 कि.मी एवढे अंतर पोहून 5 तास 31 मिनिटात पार केले. आर्य हा उरण मधील सेंट मेरीज हायस्कूल मध्ये शिकत आहे. त्याच्या या पराक्रमात त्यांचे वडील किशोर पाटील जे स्वतः राष्ट्रीय जलतरणपट्टू आहेत. तसेच त्याचे गुरु /कोच हितेश भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आर्यने सकाळी 5:25 मिनिटला मांडवा येथून समुद्रात उडी मारून समुद्राच्या लाटांना झुंज देत हा विक्रम केला आहे. या पराक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत असून आर्यच्या नातेवाईकांनी , मित्र परिवार, चाहत्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.