काँगेसच्या सदस्यांची जास्तीत जास्त डिजिटल नोंदणी करा- महेंद्र घरत
पनवेल (रायगड )
काँग्रेसच्या विचार धारेकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. या तरुण वर्गांना काँग्रेसच्या विचारप्रवाहात आणणे सर्वांचे काम आहे. काँग्रेसच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विकासकामे झाली. कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर अंतूले साहेबांनी महाराष्ट्र घडवीला. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घडवीला. कोकणचा विकास केला. अशा या विकसनशील काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचवा. असे आवाहन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उरण येथे केले.
उरण शहरातील गणपती चौकजवळ असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाचे नूतणीकरण करण्यात आले.या कार्यालयाला नवा लूक देण्यात आला. या कार्यालयाचे उदघाटन जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संध्याताई ठाकूर,उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत,तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत,उपाध्यक्ष निर्मला पाटील,शहराध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष अफशा मुकरी, अमरीन मुकरी, विनया पाटील,शहर सेक्रेटरी अमीना पटेल, केगांव सरपंच भावना पाटील, माजी नगरसेवक बबन कांबळे, जी.प सदस्य बाजीराव परदेशीं, गणेश म्हात्रे, गणेश सेवक,नित्यानंद म्हात्रे, कमळाकर घरत, उपसरपंच सुजित म्हात्रे, जयवंत पडते, अनिल ठाकूर, लंकेश ठाकूर,जितेश म्हात्रे,श्रेयश घरत आदी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रात सर्वत्र डिजिटल सदस्य नोंदणी सुरु असून रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी झाली पाहिजे. काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार करा. एकनिष्टेने व प्रामाणिकपणे काम करा. यापुढे जे पदाधिकारी कार्यकर्ते काम करणार नाहीत त्यांना त्या पदावरून लगेच काढण्यात येईल. जो काम करणार नाही त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल. व्हाट्सअप वर ऍक्टिव्ह राहण्यापेक्षा जनतेच्या गाठीभेटी घ्या. त्यांच्या समस्या जाणून घ्या त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. व्हाट्सअपवर जो कोणी पक्षाच्या विरोधात बोलेल तेंव्हा त्याच वेळी त्याला ग्रुप मधून रिमूव्ह केले जाईल. कामे केली तरच पद मिळतील. कामे नाही केली तर पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही असे सांगत महेंद्र घरत यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना झोकून काम करण्याचे आवाहन कार्यालय उदघाटन प्रसंगी केले.तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी डिजिटल सदस्य नोंदणी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विभागनिहाय, बूथ निहाय डिजिटल सदस्य नोंदणीचा आढावा विनोद म्हात्रे यांनी यावेळी घेतला. आपापसातील हेवेदावे, गटबाजी, तंटा,भांडणे वावविवाद बाजूला ठेऊन सर्वांनी काँग्रेस हा एकच गट,एकच पक्ष म्हणून एकनिष्ठेने काम करा असे आवाहन केले. उरण तालुक्यातील कोप्रोली येथील रहिवाशी तथा पत्रकार पंकज ठाकूर यांची काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाच्या उरण तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अशा प्रकारे उरण तालुका काँग्रेस पक्षाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन मोठया उत्साहात संपन्न झाले.