पनवेलमध्ये आढळला बेवारस मृतदेह….
पनवेल,(प्रतिनिधी) — पनवेल परिसरत संतोष वसंत मगदूम वय वर्ष ६० वर्ष फिरस्ता बेवारस या व्यक्तीच्या अचानकपणे छातीत दुखू लागल्याने काही नागरिकांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना देताच पोलीस पथक दाखल झाले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तो बेवारस इसमाचे मृत्यू झाल्याची माहिती दिली, त्यानुसार पोलिसांनी त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 नुसार नोंद करण्यात आली आहे. या बेवारस इसमाची वय अंदाजे 60 वर्षे अंगाने स्थूल, रंग सावळा, उंची ५ फूट १ इंच, चेहरा गोल, डोक्याचे व दाढीचे केस सफेद अशा वर्णनांचा इसमाची माहिती कोणाला असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस पोलीस ठाण्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.