*मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने नवीन कोर्ट समोरील रस्त्याला डांबरी स्लोप देण्याचे काम पूर्ण.*
पनवेल /प्रतिनिधी
अमरधाम ते स्वा.वीर सावरकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्णत्वाकडे आहे.या रस्त्यावरील पथदिवे लावण्याच्या कामालाही सुरवात झाली आहे.या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यामुळें रस्त्याची उंची वाढली त्यामुळें नवीन कोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याला उतार जास्त होता.त्यावेळी तात्पुरता उपाय म्हणून दगड आणि माती टाकून रस्त्याला उतार देण्यात आला होता.पण सध्या हा उतारावरील रस्त्याची परिस्थिती खराब झाली होती आणि रहदारीला सुद्धा त्रास होत होता.या विषयाची माहिती स्थानिक रहिवाशी,रिक्षावाले आणि वाहन चालकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली. लगेचच महापालिका अधिकारी आणि काँट्रॅक्टरशी बोलून हा विषय निकाली काढला.स्वतः जातीने उभे राहून रस्त्याचे काम व्यवस्थित होत आहे नाही याकडे लक्ष देऊन होते.प्रभागातील समस्या सोडवण्यास नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्राधान्य देत आले आहेत.समस्येचे निरसन लवकरात लवकर करण्याकडे ते स्वतः जातीने लक्ष देत असतात,त्याबद्दल नागरिकांनी आणि स्थानिक रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.