जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील आणि राष्ट्रवादी नेते प्रशांत पाटील यांच्या मध्यस्तीने झाली पहिली बैठक
उरण/प्रतिनिधी :
दिनांक 28/03/2022 रोजी जेएनपीटी प्रशासनातर्फे सेक्रेटरी जयवंत ढवळे , डेप्युटी मॅनेजर संजीव पगारे , जी बी मोरे डेप्युटी मॅनेजर IR यांनी न्हावा शेवा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या उपस्थितीत निशांत घरत यांच्या उपोषण स्थळी भेट देवून सविस्तर चर्चा केली. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे मनीषा जाधव यांच्या विरोधात, खोटे दाखले सादर करून JNPT मध्ये नोकरी मिळविल्याबाबत प्रमोद ठाकूर,काशिनाथ गायकवाड, मनीष कातकरी आणि भरत वामन ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीबाबत सखोल चर्चा केली. जयवंत ढवळे यांनी सांगितले की मनीषा जाधव यांना दिनांक 14/03/2022 रोजी प्रशासनातर्फे शो कॉज नोटीस बजावण्यात आली असून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. ती दिनांक 28/03/2022 रोजी संपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जयवंत ढवळे पुढे असेही म्हणाले की मनीषा जाधव यांनी आज पर्यंत कोणताही लेखी खुलासा दिला नसून त्याचा अर्थ त्यांना त्यांच्यावर केलेले आरोप मान्य असावेत. जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांनी मनीषा जाधव यांना तातडीने निलंबित करून हाई कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश कडून चौकशी करण्यात यावी ही अशी मागणी केली तर राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांनी मनीषा जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचून दाखवला आणि त्यांची उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली. तसेच त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. आणि हाई कोर्टात जनहित याचिका दाखल करणार असे सांगितले. यावर तुम्ही सुचवाल त्या व्यक्तीस आम्ही या प्रकरणी तपास आधिकारी म्हणून नेमायला तयार आहोत असे जयवंत ढवळे यांनी प्रतिपादन केले.तसेच मनीषा जाधव यांचे वडील अभिमन्यू वळवी आणि भाऊ संदीप वळवी यांची जात हिंदू भिल्ल असल्याने मनीषा जाधव यांची जात देखील हिंदू भिल्ल आहे हे स्पष्ट होत आहे अशी चर्चा झाली. कोणत्याही व्यक्तीची जात ही त्यांच्या वडिलांच्या जातीवरून ठरते.आई किंवा नवऱ्याच्या जाती वरून ठरत नाही असे काशिनाथ गायकवाड यांनी समजावून सांगितले.त्यावर उपोषणकर्ते ऍड.निशांत घरत यांनी मनीषा जाधव यांना तातडीने सेंट्रल चा जातीचा दाखला सादर करण्यास सांगावे आणि त्यांचे निलंबन करून अथवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्या शिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असे ठाम पने सांगितले. सदर मीटिंग साठी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष काशिनाथ गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी,सदस्य प्रमोद ठाकूर,प्रकाश म्हात्रे,चैतन्य पाटील,मनस्वी घरत तसेच नवीन शेवा गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.