भेंडखळ येथील हार्ट अटॅक आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद.
उरण /प्रतिनिधी :
हार्ट अटॅक आणि हार्ट संदर्भात रोगाचे वेळीच निदान व्हावे या दृष्टी कोणातून पालवी सामाजिक संस्था तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सुश्रूषा सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल, नविन पनवेल यांच्या सहकार्याने हार्ट व हार्ट अटॅक संबंधित सर्व चाचण्या सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. पालवी सामाजिक संस्था, विजय-विकास सामाजिक संस्था, नवतरुण मित्र मंडळ आणि सुश्रूषा सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल डॉक्टर राजेंद्र शिरसागर (CMO),कॅम्प व्यवस्थापक रत्नमाला पाबारेकर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 29 मार्च 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, भेंडखळ येथे “मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर” आयोजित करण्यात आले होते . या शिबीरात, ऑक्सिजन लेवल,वजन, रक्तदाब, ई. सी. जी.,2D ईको,रॅंडम ब्लड शुगर टेस्ट, एक्स रे, टी. एम. टी आदी चाचण्या मोफत करण्यात आल्या.तसेच ज्यांना एन्जीओग्राफी करण्याची आवश्यकता लागत असेल तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केशरी व पिवळ्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांची एन्जीओग्राफी मोफत करण्यात येणार असल्याची माहिती शिबिरात देण्यात आली . या शिबीराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला.या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी केले. यावेळी विजय विकास सामाजिक संस्थेचे विकास भोईर, ग्रामपंचायत सदस्य किशोर ठाकूर, संध्याताई ठाकूर, सोनाली ठाकूर, नीता ठाकूर, निलम भोईर, सुचिता ठाकूर, रायगड भूषण नरेश ठाकूर, जेष्ठ नागरिक अनंत ठाकूर, कॅम्प व्यवस्थापक रत्नमाला पाबारेकर, डॉ मनीषा गांगरे, डॉ ऋतुजा पाटील, डॉ श्रद्धा राणे, डॉ दिव्या, बामण लॉरी कंपनीचे सिनिअर मॅनेजर आर लुईस, अधिकारी राजेश राघवन,पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर, सेक्रेटरी विजय भोईर, लिलेश्वर ठाकूर, अनिल ठाकूर, सतीश घरत, किरण पाटील, शरद म्हात्रे, दीपक भोईर, चंद्रविलास घरत, तुळसीदास म्हात्रे, राजश्री घरत, पुष्पांजली घरत,प्रगती घरत,सुनील वर्तक -अध्यक्ष गोवठने विकास मंच, जरी मरि आई नवरात्रौत्सव मंडळाचे किरण घरत, राकेश भोईर, कौशिक भोईर, प्रांजल भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकंदरीतच या आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.या शिबीरात 72 नागरीकांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या. यातील 20 जणांना 2D ईको सजेष्ट केल्या असुन या सर्वांच्या 2D ईको सुश्रूषा सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर यांनी दिली