रेश्मा ठाकूर आदर्श सरपंच सम्राट पुरस्काराने सन्मानित.
उरण/प्रतिनिधी :
नवराष्ट्र व नवभारत वृत्तपत्र आयोजित सरपंच सम्राट सोहळ्यात जिल्हास्तरीय आदर्श सरपंच सम्राट पुरस्कार 2022 ने धुतूम ग्रामपंचायत सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांना रायगड जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच यांनी हा सन्मान आमच्या धुतूम ग्रामस्थांचा असून विविध उपक्रमात प्रत्यक्षपणे नागरिकांचं असलेलं सहभाग व मार्गदर्शन या मुळेच विकास कामे करू शकले, हा त्यांचा सन्मान आहे.तसेच नवराष्ट्र व नवभारत समूहाने आम्हाला सन्मानित केल्या बद्दल मनःपूर्वक आभार.असे मत व्यक्त केले.
या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला रायगड जिल्हा पालकमंत्री आदीतीताई तटकरे, आमदार भाई जयंत पाटील , आमदार अनिकेत तटकरे, प्रितम दादा म्हात्रे विरोधी पक्ष नेते पनवेल मनपा, सुप्रसिध्द अभिनेते भाऊ कदम, रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगड अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , दैनिक नवराष्ट्र समूहाचे उपाध्यक्ष श्रीनिवास सर, नवराष्ट्र समूहाचे व्यवस्थापक सचिन फुलपगारे, अभिनेत्री मेघना एरंडे, रायगड जिल्हा जाहिरात प्रतिनिधी शमुकुंद बेंबडे तसेच रायगड जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपसरपंच शरद ठाकूर आणि माजी उपसरपंच सविता रुपेश ठाकूर यांनी अलिबाग येथील पी एन पी नाट्यगृह येथे हजेरी लावली. अगोदर राज्यस्तरीय आणि आता जिल्हास्तरिय पुरस्कार प्राप्त झाल्याने मित्र परिवार आणि कार्यकर्ते यांनी सरपंच रेश्मा ठाकूर यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.