सावरगाव येथे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण मेळावा संपन्न
पनवेल /प्रतिनिधी :
आष्टी तालुक्यातील सावरगाव केंद्रातील शिक्षकांचा शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण मेळावा मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिराबाई पाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानदेव अडसरे तर देवस्थानचे अध्यक्ष व केंद्रीय मुख्याध्यापक दादासाहेब चितळे ज्येष्ठ शिक्षक सुभाष लांडगे संतराम शिरसाठ हे होते .
महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण मेळावे संपन्न होत आहे .यामध्ये पहिलीमध्ये प्रवेश घेण्याच्या अगोदर मार्च एप्रिलमध्येच पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी व त्यांच्या वेगवेगळ्या क्षमता तपासण्यासाठी हे मेळावे शाळा स्तरावर आयोजित करावयाची आहेत. यासाठी प्रत्येक केंद्रस्तरावर शिक्षक व अंगणवाडी ताईंचा प्रशिक्षण मेळावा घेण्यात येत आहे .यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रमाची माहीती देऊन विद्यार्थ्यांची माहिती संकलन व पालकांचे प्रबोधन करायचे आहे .
मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव ता. आष्टी याठिकाणी संपन्न झालेल्या मेळाव्यांमध्ये सुलभक म्हणून बाळासाहेब पुंडे व श्रीमती डोके के. एन यांनी अतिशय सुंदररीत्या या कार्यक्रमाचे नियिजन व उपक्रमांची मांडणी करण्यात आली .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर याठिकाणी कामाच्या स्वरुपाचं विश्लेषण करण्यात आलं त्यानंतर शिक्षक व अंगणवाडी ताईंचे गट करून त्यांना गट कार्य देण्यात आले .नंतर प्रत्येक गटातील गटप्रमुखाने आपापल्या गटातील कार्याचे सादरीकरण केलं . त्यानंतर बालकांच्या क्षमता तपासण्यासाठी सात प्रकारचे स्टॉल याठिकाणी उभारण्यात आले हाेते .प्रतीकात्मक प्रभातफेरी अंगणवाडीताई व शिक्षकांची काढण्यात आली होती .यामध्ये प्रवेशासंबंधी घोषणा देण्यात आल्या ढोल वाजवण्यात आले .या मेळाव्यात नवले मॅडम नेहुल मॅडम डोके मॅडम राऊत मॅडम आंधळे मॅडम यांनी प्रवेशद्वारापाशी काढलेली रांगोळी खास आकर्षण ठरलं .निसर्गातील पानाफुलांत पासून महिलांनी खास रांगोळी काढली होती ते विशेष आकर्षणाची ठरली .वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये असणा-या क्षमता तपासण्यात आल्या .
या कार्यक्रमासाठी सावरगाव केंद्रातील सावरगाव शेंडगेवाडी गंगादेवी शेडाळा लमाणतांडा देऊळगाव लमाणवाडी अरणविहरा गहुखेल तागडखेल लमाणतांडा गहुखेल येथील अंगणवाडीताई शिक्षक उपस्थित होते.