अत्याधुनिक शौचालये उभे करून देण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः अत्याधुनिक शौचालये उभी करून देण्याची मागणी आज शिवसेना शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
यावेळी शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्यासह महिला शहर संघटीका अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपशहरप्रमुख सनी टेमघरे, अबरार मास्टर, शैलेश जगनाडे, विश्वास म्हात्रे, विभागप्रमुख प्रसाद सोनावणे आदी उपास्थित होते. या निवेदन देताना प्रवीण जाधव यांनी सांगितले की, पनवेल मधील हुतात्मा हिरवे गुरूजी स्मारकाजवळ बरेच वर्षे जुने शौचालय होते. सदरचे शौचालय महानगरपालिकेने तोडले आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी नागरीकांस शौचालय उपलब्ध नाही. हुतात्मा हिरवे गुरूजी बागेत खुप प्रमाणात जेष्ठ नागरीक , लहान मुले असतात. त्यांना शौचालयाच वापर होत होता. पालिकेने शौचालय तोडण्याअगोदर दुसरा पर्याय उपलब्ध करायला पाहिजे होता , परंतु काही गाळेधारकांना सोईस्कर म्हणून शौचालय तोडले असे पनवेल शहरात चर्चा आहे. तरी महापालिकने गाळेधारकांना सोईस्कर म्हणून शौचालय तोडले असले तरी सर्व सामान्य नागरीकांना होणारा त्रास पालिकेच्या नजरेत आला नाही का ? महापालिकेने शौचालयाच्या जागेवर काही काम चालू केले असे दिसते. सदर जागेवर शौचालय बांधून नागरीकांना होणारी गैरसोय , त्रास कमी करावा. सदरच्या जागेवर अत्याधुनिक शौचालय बांधावे ही पनवेल शहर शिवसेने तर्फे मागणी करीत आहोत, अन्यथा सदर जागेवर शिवसेना आंदोलन करेल, अशी मागणी यावेळी केली.
फोटो ः निवेदन देताना प्रवीण जाधव यांच्यासह आदी मान्यवर.