कळंबोलीतील उद्यान पाण्याविना सुकू लागली, नळ जोडणी तोडली ,बोरवेल ची व्यवस्था करणार.
पनवेल /प्रतिनिधी :जनतेला प्यायला पाणी नाही तर उद्यानांना कुठून पाणी देणार या विचित्र नियमावलीनुसार कळंबोलीतील उद्यानाचे चे पाणी जोडणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कळंबोलीतील उद्यानातील झाडे पूर्णता सुकू लागली आहेत. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत .एकीकडे पाण्यासाठी उपाय योजना करता येत नसतानाही मात्र अन्य कामे मात्र ३१ मार्च च्या अगोदर करण्याचा पूर्ण करण्याचा खटाटोप सिडको प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे मात्र दिसून येत आहे. याबाबत सिडकोचे कळंबोलीतील अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्यानातील नळजोडणी बंद करण्यात आली असून आता बोरवेल ची व्यवस्था करून झाडांना पाणी पुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचे सांगितले.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ६ मध्ये मोठे उद्यान आहे. उद्यानात गेले पाच ते सहा दिवसापासून झाडांना पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे उद्यानातील झाडे सर्व सुकू लागली आहेत. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. या उद्यानांमध्ये माळी काम करणारा माणूस तर दिसून येत नाही . उद्यान मध्ये जी व्यवस्था पाहिजे ती पूर्णपणे देण्यात आलेली दिसून येत नाही. सुरक्षारक्षकही नाही, त्यामुळे उद्यानामध्ये सायकल चालवतात तर काहीजण फुटबॉल खेळतात .फुटबॉलचा प्रसादही आबालवृद्धांना बसून जखमी होण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. स्थितीत पाणी पुरवठा नसल्याने झाडे पूर्ण पने सुकू लागली आहेत. याबाबत सिडको विभागातील गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सिडकोच्या वरिष्ठ पातळीवरूनच उद्यानातील पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनाच प्यायला पाणी अपुरे असल्याने झाडा ना पाणी कसे देणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पुढे बोरवेल खणून झाडांना पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल असे सांगण्यात आले.एकीकडे उद्यानातील झाडांना पाण्यासारखी महत्त्वाची जीवनावश्यक बाब आवश्यक असताना मात्र बांधकाम विभागातील कामे ३१ मार्च च्या पूर्वसंध्येला पूर्ण करण्याचा खटाटोप करताना मात्र नागरिकांना दिसून आला. उद्यानात काही ठिकाणी सिमेंट ब्लॉक बसवण्यात आले मात्र अन्य पूर्वीच्याच सिमेंट ब्लॉक न कलर मारून नवीन करण्यात आल्याचे दाखवण्यात आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उद्यानातील खेळणी ही तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत. कचऱ्याचे ढीग पुन्हा रचू लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक व माळी काम करणारा कोणीही दिसून येत नाही .त्यामुळे उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .येथे विजेचे दिवेही पूर्णावस्थेत सुरू नसल्याने रात्रीच्या वेळी गर्दुल्ले व मद्यपी येथे ठाण मांडून बसलेले असतात. याकरता उद्यानात कायमस्वरूपी माळी काम करणारा व सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.