उरण तालुक्यातील सारडे गावात “नटखट कान्हा ग्रुप सारडे “च्या माध्यमातून “गुढीपाडवा उत्सव 2022” मोठ्या जल्लोषात साजरा.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )मराठी नववर्षाचा स्वागत करत असताना आपली संस्कृती,आपली परंपरा,आपला मराठमोळया इतिहासाचा वारसा पूढच्या पिढीला कळावा या उद्देशाने उरण तालुक्यातील सारडे गावातील “नटखट कान्हा ग्रुप सारडे ” यांच्या माध्यमातुन दर वर्षी “गुढीपाडवा उत्सव ” मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा केला जातो.प्रत्येकवेळी नवनवीन कार्यक्रमांची संकल्पना या ग्रुपच्या माध्यमातून दर वर्षी राबवली जाते.
यावर्षी शिवस्पर्श ढोलताशा पथक दादर – पेण यांचा वाद्यकलासंगम व रा.जि.प शाळा सारडे मधील मुलांची पारंपारिक वेशभूषा व लेझीम पथक हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. सरपंच चंद्रशेखर छगन पाटील व ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्यांच्या शुभहस्ते गुढीचे पूजन झाले.तसेच गावात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.शेवटी दुपारी 12.00 वाजता श्री.राधाकृष्ण मंदिरात महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम प्रसंगी चंद्रशेखर छगन पाटील (सरपंच सारडे),समीर अभिमन्यू पाटील (उपसरपंच सारडे),भारतीताई संकेत पाटील – सदस्या, भगवातीताई अविनाश पाटील – सदस्या,शामकांत राजाराम पाटील – सदस्य,घनश्याम जयवंत पाटील – पोलिस पाटील सारडे,माजी उपसरपंच संदीप धनाजी पाटील,गोपाळ म्हात्रे,जीवन पाटील,सुरेश पाटील,परशुराम पाटील,बाळकृष्ण पाटील,रा.जी.प.शाळा सारडेचे सर्व शिक्षक वृंद,नवनीत पाटील,जनार्दन पाटील,ए. डी. पाटील,सुनील पाटील,सर्व ग्रामस्थ व मित्र मंडळी यावेळी उपस्थित होते.