गुढीपाडवा निमित्त उलवे शहरात कडूलिंबाचे वृक्षारोपन.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात घरोघरी गुढी ऊभारुन हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांचे नविन वर्ष हे ह्याच दिवशी सुरु होते.आणि ह्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने कडूलिंबाचे रोपन करण्यात आले. भारतीय सण आणि निसर्ग यांचे अतुट नातं आहे. गुढी ऊभारताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी लावली जाते. शिवाय ह्या दिवशी कडुलिंबाचे पाने खाण्याचीही प्रथा आहे. आपले नविन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पुर्वजांनी पाडव्याला कडूलिंबाचे पानांचे सेवन करण्याचे सांगितले आहे. प्राचिन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून कडूलिंबाचे खुप महत्व आहे.
भारतीय सण साजरे करण्यात ज्या ज्या पवित्र वनस्पतींचा समावेश येतो त्या त्या वनस्पतींची लागवड उलवे शहर परिसरात करण्याचा संकल्प वटवृक्ष सामाजिक संस्थेचा असून हिंदू नववर्षाचा आरंभ हा निसर्गसेवेच्या शुभारंभातून म्हणजेच कडूलिंबाचे रोप लागवड करुन वटवृक्ष सामाजिक संस्थेने गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, धनंजय तांबे, मनोहर चवरकर, संदेश साळुंखे, शिवदास कोळी, संतोष शिंदे, गणेश मढवी, प्रतिश पाटील, अनिल कांबळे, सचिन पाटील, शांताराम ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थित वृक्षारोपन करण्यात आले.