सिद्धि डायग्नोस्टिक सेंटरचे कोप्रोली येथे उदघाटन
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पूर्व विभागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याशी संबंधित विविध चाचण्या करण्यासाठी एकतर उरणला जावे लागत होते किंवा पनवेल, वाशीला जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचे श्रम, पैसा वाया जात होता. मात्र नागरिकांचे आता श्रम व पैसे याची बचत होणार आहे. कारण आरोग्याशी संबंधित विविध चाचण्यांचे सेंटर कोप्रोली येथे सुरु झाले आहे.
दत्तात्रेय कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 7,8 कोप्रोली चौक, कोप्रोली येथे सिद्धी डायग्नोस्टिक सेंटरचे उदघाटन पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पांडुरंग पेशेट्टीवार व पिरकोन येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ नामदेव म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ सिद्धार्थ पेशेट्टीवार(रेडिओलॉजिस्ट ), ओनर अक्षय पाटील, सेंटरचे कर्मचारी समाधान गावंड, प्रणाली पाटील, किमया पाटील, सारिका गावंड, जयेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.टूडीको, सोनोग्राफी, कलर डॉपलर, इसीजी आदी चाचण्या येथे नागरिकांना उपलब्ध होणार असून यामुळे पूर्व विभागातील नागरिकांचे श्रम व पैशांची बचत होणार आहे.