नगरसेवक राजू सोनी यांचा करण्यात आला सोसायटीतर्फे विशेष सत्कार !!
पनवेल दि.05 (संजय कदम) : पनवेल शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील सोसायटीतील पाण्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांचा विशेष सत्कार यशोअनुअनंत सोसायटीच्या वतीने करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसापासून या सोसायटीतील रहिवाश्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. या संदर्भात त्यांनी नगरसेवक राजू सोनी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपली कैफियत मांडली असता राजू सोनी यांनी तात्काळ हा प्रश्न निकाली काढीत सोसायटीचा पाणी पुरवठा सुरळीत केला. याबद्दल सोसायटीच्या वतीने आयोजित छोट्याखानी कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजू सोनी यांनी सांगितले कि, ‘येथील रहिवाश्यांना कुठलीही समस्या असल्यास त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा. आपल्या समस्यांचे त्वरित निराकरण करीन असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष रामदास शेडगे , सचिव अभिजित म्हात्रे , सदस्य निशांत शेडगे , सुनील शेडगे , राजेंद्र वाणी , अतुल शहा , हितेश शहा व संग्राम शेडगे आदी उपस्थितीत होते .
फोटो : नगरसेवक राजू सोनी यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार