एटीएम कार्ड एक्सेंज करुन फसवणूक करणा-या बिहार राज्यातील ८ जणांच्या टोळीस घातक शस्त्रासह व ८९ एटीएम कार्डसह गुन्हे शाखा कक्ष २ कडुन अटक ( एकुण १२ गुन्हयांची उकल )
एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकाला विचलीत करुन पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्याचा पिन नंबर जाणून घेवून हातचलाकीने एटीएमची अदलाबदल करून स्वतःजवळील त्याच बँकेचे ब्लॉक झालेले एटीएम त्या ग्राहकास देवून त्याचे चालू कार्ड स्वत:कडे घेवून त्याद्वारे पैसे काढून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणा-या बिहार राज्यातील ०८ जणांच्या टोळीस पनवेल शहरातील काही एटीएम सेंटरवर घातक शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा, कक्ष २, पनवेल यांनी अटक करुन त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रांसह विविध बँकांचे ८९ एटीएम कार्डस हस्तगत केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकाला विचलीत करून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्याचा पिन नंबर जाणून घेवून हातचलाकीने एटीएमची अदलाबदल करुन स्वतःजवळील त्याच बँकेचे ब्लॉक झालेले एटीएम त्या ग्राहकास देवून त्याचे चालू कार्ड स्वत:कडे घेवून त्याद्वारे पैसे काढून सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत असल्याबाबत अनेक तकारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणेस प्राप्त झाल्या होत्या. नागरीकांमध्ये पोलीसांविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा.पोलीस आयुक्त श्री बिपीनकुमार सिंह, मा सह पोलीस आयुक्त डॉ. श्री जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री महेश घुर्ये, मा पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री सुरेश मेंगडे यांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळया टिम तयार करण्यात आल्या होत्या.
गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून फसवणूक झालेल्या लोकांकडून कशाप्रकारे फसवणूक झाली याची माहिती घेवून संबंधित एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज, डमडाटा याचा अभ्यास करत असताना अशा प्रकारची गुन्हे करणारी बिहार राज्यातील एक टोळी सकीय असल्याबाबत खात्री झाली. ही टोळी बिहार राज्यातून काही कालावधीसाठी मुंबईत येवून गुन्हे करुन परत बिहार येथे निघून जात असलेबाबत आढळून आले. त्यांच्यावर निगराणी ठेवली असता, सदरची टोळी अशा प्रकारचे गुन्हे करुन मोठया प्रमाणात रक्कम लुटून पसार होण्यासाठी पनवेल शहर येथील काही एटीएम सेंटरवर दरोडा टाकणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा, कक्ष २ ला माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सदर ०८ इसमांची टोळी कर्नाळा स्पोर्टस लगतच्या परिसरात एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याकरीता दरोड्याची तयारी करत असताना घातक शस्त्रासह मिळून आली. त्यांचेविरुध्द पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १६४/२०२२ भा.द.वि. कलम ३९९, ४०२ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद
एकुण ०८ लोकांकडे घातक शस्त्रासह वेगवेगळया बँकाचे एकुण ८९ एटीएम कार्डस मिळून आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) बच्चा महावीर महातो, वय ४३ वर्षे, रा. मठीया बरीयापुर, थाना पीपराकोठी, पोस्ट मथुरापूर, जि. मोतीहारी, बिहार
२) मुनीलाल कुमार कृष्णा महातो, वय २५ वर्षे, सध्या रा. ज्यु चंद्र झोपडपट्टी, गल्ली नंबर ३ व ४, नायगाव, जि. ठाणे मुळ रा. मठीया बरीयापुर, थाना पीपराकोठी, पोस्ट मथुरापूर, जि. मोतीहारी, राज्य बिहार
३) नवीन इंदर सवान, वय २४ वर्षे, सध्या ज्यु चंद्र झोपडपटटी, गल्ली नंबर ३
व ४, नायगाव, जि. ठाणे मुळ रा. माधोवपुर, पो. टनसारीया, थाना तुरकवलिया, जि. मोतीहारी, राज्य बिहार ४) नरेशकुमार रामबाबु सहाणी, वय ३१ वर्षे, सध्या रा. ज्यु चंद्र झोपडपटटी, गल्ली नंबर ३ व ४, नायगाव, जि. ठाणे मुळ रा. मठीया बरीयापुर, थाना पीपराकोठी,
पोस्ट मथुरापूर, जि. मोतीहारी, राज्य बिहार
५) सुनिल बोंधा स्वामी, वय २६ वर्षे, सध्या रा. ज्यु चंद्र झोपडपटटी, गल्ली नंबर ३
व ४, नायगाव, जि. ठाणे मुळ रा. मठीया बरीयापुर थाना पीपराकोठी, पोस्ट
मथुरापूर, जि. मोतीहारी, बिहार
६) भदाई हिरामण सहाणी, वय २८ वर्षे, सध्या रा. ज्यु चंद्र झोपडपटट्टी, गल्ली नंबर
३ व ४, नायगाव, जि. ठाणे मुळ रा. समराबनोतीया, पो. बनोतीया, ता. तिरकोलीया, जि. मोतीहारी, राज्य बिहार
७) आवधेश लालजी पासवान, वय २८ वर्षे, सध्या रा. ज्यु चंद्र झोपडपटट्टी, गल्ली
नंबर ३ व ४, नायगाव, जि. ठाणे मुळ रा. समराबनोतीया, पो. बनोतीया,
ता. तिरकोलीया, जि. मोतीहारी, राज्य बिहार
८) मोहम्मद रिझवान मोहम्मद नन्ने, वय ३२ वर्षे, सध्या रा. ज्यु चंद्र झोपडपट्टी, गल्ली नंबर ३ व ४ नायगाव, जि. ठाणे मुळ रा. समराबनोतीया, पो. बनोतीया, ता. तिरकोलीया, जि. मोतीहारी, राज्य बिहार
नमुद अटक आरोपीकडुन गुन्हे शाखा कक्ष २ यांनी एटीएम कार्ड एक्सेंज करुन फसवणूकीचे एकुण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अजूनही अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची उत्कृष्ट कारवाई नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीधर गोरे, सपोनि. संदिप गायकवाड, सपोनि. प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, पोउपनि वैभवकुमार रोंगे, सफी / सुदाम पाटील, पोहवा / १०३४ ज्ञानेश्वर वाघ, पोहवा / १३४३ मधुकर गडगे, पोहवा / ४२० सचिन पवार, पोहवा / १७३२ अनिल पाटील, पोहवा / १३३९ प्रशांत काटकर, पोहवा / १९३ रणजित पाटील, चापोहवा / १९३० राजेश बैकर, पोना/ १७९९ निले पाटील, पोना / २०२२ रूपेश पाटील, पोना / २०८२ इंद्रजित कानु, पोना / २००५ सचिन म्हात्रे, पोना / १७३८ दिपक डोंगरे, पोना / ४४१३ आजिनाथ फुंदे, पोना/ २३३४ प्रफुल्ल मोरे, पोना/ २२५६ राहुल पवार, पोशि/१२५९३ संजय पाटील, पोशि/ ३५७७ प्रविण भोपी, पोशि/ ४३१७ विकांत माळी यांनी केली आहे.