एकाच हंगाम्यात आठ कुस्त्या चितपट करणारा पैलवान मयुर तांबे
कुस्ती आवडल्याने ग्रामस्थांनी लावली आठ वेळस कुस्ती
कु्स्ती शौकनांनी वैयक्तीक केली बक्षीसे जाहीर
अंभोरा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील अंबेश्वर यात्रेनिमीत्त जंगी कुस्त्यांची दंगल संपन्न झाली. या कुस्त्यांच्या दंगलीत मयुर तांबे या सतरा वर्षीय युवकाने सर्वाचे लक्ष वेधत याच ठिकाणी आठ कुस्त्या चितपट केल्या ग्रामस्थांनी व इतर गावाहुन आलेल्या कुस्ती शौकीनांनी बक्षीसाचा अक्षरक्ष: वर्षाव केला.एकाच हंगामामध्ये आठ वेळेस कुस्त्या खेळून त्या चितपट केल्याने सगळ्याचा अभिनंदनास पात्र ठरलेला मयूर कैलास तांबे हा पहिलवान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणचे रहिवासी आहे .मयूर तांबे हा सध्या बिराजदार मामा कुस्ती संकुल पारनेर या ठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण वस्ताद संदीप कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे .गेल्या दोन वर्षांपासून मयूर तांबे याठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे .मयूर तांबे या या नवीन युवक पैलवानास त्याचे आजोबा सत्यवान ढोबळे यांच्यापासून कुस्ती प्रेरणा मिळाली .जत्रेत भरणा-या आतापर्यंत पंधरा ते वीस ठिकाणी त्याने कुस्त्या खेळल्या असून ज्या ठिकाणी हा पहिलवान जाईल कुस्ती खेळण्यासाठी त्याठिकाणी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे मयूर तांबे पैलवानाने अंभोरा-च्या हंगामामध्ये पहिली कुस्ती खेळली अतिशय रोमहर्षक रीत्या समोरच्या पहिलवानाला चितपट केले त्यानंतर आठ वेळेस कुस्ती शौकिनांनी वैयक्तिक बक्षिसे देऊन याच आखाड्यात त्याची कुस्ती लावली .मात्र या आठही वेळेस तितक्याच चलाखीने समोरच्या पैलवानांना चितपट करून तो विजयी ठरला शेवटी त्या ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कमी वय असतानाही अशाप्रकारची कुस्ती करून सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले .आणि भविष्यामध्ये नक्कीच मयूर तांबे हा एक यशस्वी राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर तो आपले नाव चमक वेल यात तिळमात्रही शंका नाही