खांदा वसाहतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती होणार मोठ्या उत्साहात साजरी
पनवेल दि.०८ (वार्ताहर) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त खांदा कॉलनीतीलभारतीय बौध्द महासभा ( विभाग क्र – १०), बौध्दजन पंचायत समिती ( शाखा क्र – ७४१), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक मंडळ, जीवन ज्योती ज्येष्ठ नागरिक संघ, धम्मयान संस्था, त्रिरत्न बौद्ध महासंघ, ब्लू लाईन युनीटी असोसिएशन, भीमशक्ती युवा फोर्स, भीमयुवा मित्र मंडळ, छत्रपती क्रांती सेना, अखिल भारतीय छावा संघटना, परिवर्तन सामाजिक संस्था, जागृत,सोच फाउंडेशन महिला मंडळ, आझाद कामगार संघटना या सर्व संस्था एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती खांदा कॉलनी 2022 या नावाने जोरदार साजरी करणार आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढणार आहेत. तसेच सर्वानुमते कामगार नेते महादेव वाघमारे यांची जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच खांदा कॉलनीत असा बदल घडून सर्वांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात असून तरुण, ज्येष्ठ,महिला असा सर्वांनी उत्साहात जयंती कार्यक्रमास सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. १3 एप्रिल रोजी तक्षशिला बुद्धीविहार सेक्टर 9 येथे निबंध,चित्रकला, नृत्य, गायन ,वकृत्वस्पर्धा तर 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ध्वजारोहन व बुद्ध वंदना 11 वाजता व्याख्याते गोपाळ गंगावणे यांचे व्याख्यान होणार आहे
चौकट : 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता तक्षशिला बुद्ध विहार सेक्टर 9 खांदा कॉलनी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक निघणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केले आहे