मनोज पाटील यांची राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड .
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय “सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२” सा़ठी उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र सध्या सु़धागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सु़धागड विद्यासंकुलात अध्यापनाचे कार्य करत असणारे शिक्षक मनोज पाटील यांना जाहीर झाला आहे.सदर पुरस्कार निवडीचे पत्र सुधागड विद्यासंकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे,उपमुख्याध्यापिका सरोज पाटील ,पर्यवेक्षक वैजनाथ भद्रशेट्टे ,पुरस्कार निवड समिती रायगड जिल्हा प्रमुख सुरेश शिंदे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले .
मनोज पाटील यांनी यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पेण तालुक्यातील रावे येथील माध्यमिक शाळेत १९९६ मध्ये आपल्या अध्यापण कार्याला सुरूवात केली होती.अध्यापण कार्याबरोबरच तेथे त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयन्नशील राहीले आहेत.जानेवारी २०१४ मध्ये ते सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यास सुरवात केली तेथेही त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयन्नशिल आहेत.
शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी आपल्या महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक ,शैक्षणिक,आरोग्य,क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.आज पर्यंत त्यांना भारत सरकार चा युवा पुरस्कार ,रायगड जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,रायगड भूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .सदर पुरस्कार वितरण अंकुशराव लांडगे नाट्यगृह ,भोसरी -पुणे येथे १५ मे २०२२ रोजी होणार आहे.