जेएनपीटी अधिकारी मनीषा जाधव यांचे होणार निलंबन ?
ॲड निशांत घरत यांना उपोषणाला बसायची गरज लागणार नाही
जयवंत ढवळे (CMA ) यांची ग्वाही
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )जेएनपीटीच्या कर्मचारी श्रीमती मनीषा जाधव (मॅनेजर P&IR) यांच्याविरोधात आमरण उपोषण कर्ते ॲड निशांत घरत आणि मुख्य तक्रारदार प्रमोद ठाकूर यांनी मंगळवार दिनांक 12/04/2022 रोजी JNPT चे मुख्य प्रबंधक आणि सेक्रेटरी जयवंत ढवळे आणि मुख्य दक्षता अधिकारी व्हीं. ए. मालेगावकर यांची भेट घेतली. यावेळी आमरण उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासना मध्ये सांगितल्या प्रमाणे दर सात दिवसांनी सदर प्रकरणात प्रशासनाकडून देण्यात येणारी अद्ययावत माहिती घेण्यासाठी ॲड निशांत घरत गेले होते. त्यावेळेस जयवंत ढवळे यांनी असे सांगितले की मनीषा जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असून तुला 1/05/2022 रोजी उपोषणाला बसायला लागणार नाही एवढे निश्चित. त्यांच्यावर कधीही बडतर्फ किंवा निलंबनाची कारवाई होवू शकते.असे ढवळे यांनी सांगितले.निशांत घरत आणि प्रमोद ठाकूर यांनी नवीन पुरावे आणि शासन निर्णय सादर करून श्रीमती मनीषा जाधव यांच्या विरोधातली तक्रार आणखीन मजबूत केली आहे.
जेएनपीटीचे मुख्य दक्षता अधिकारी व्ही.ए.मालेगावकर यांना जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांनी सुरुवातीपासूनचा इतिहास विस्तृत पने समजावून सांगितला.यावर मालेगावकर यांनी याप्रकरणी निःपक्षपाती चौकशी करून सीव्हीसी च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. एक मात्र निश्चित आहे की जेएनपीटी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासना नुसार जर 30 एप्रिल पर्यंत जर समाधानकारक कारवाई झाली नाही तर निशांत घरत 01 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत हे निश्चित झाले आहे.आणि त्यावेळेस ज्या प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दीले होते. त्यांच्या विरोधातच आमरण उपोषणाला निशांत बसणार आहे.ॲड निशांत घरत उपोषणकर्ते तथा माजी सरपंच नवीन शेवा हे आपल्या मागण्यावर ठाम आहेत.प्रमोद रामनाथ ठाकूर मुख्य तक्रारदार हे सुद्धा या विरोधात आवाज उठवत आहेत.