पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची नियुक्ती
पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) : ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली असून, आज (मंगळवार दि.१९ एप्रिल) आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते.
कल्पिता किशोर पिंपळे यांनी यापूर्वी सर्वप्रथम २०१० ते ऑगस्ट २०१४ यादरम्यान अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर ऑगस्ट २०१४ ते जून २०१७ यादरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जुलै २०१७ ते डिसेंबर २०२० यादरम्यान नगरपरिषद प्रशासन संचालनालय सहाय्यक संचालक पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर २३ डिसेंबर २०२० ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि निर्भीडपणे निभावली.फोटो -कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती