*जुन्या भाजी मार्केट परिसरात अनधिकृतरित्या गजरे विकणाऱ्यांवर कारवाई करावी – नगरसेविका कु. रुचिता लोंढे*
पनवेल /प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील जुने भाजी मार्केट विभागातील कृष्णाळे तलाव व त्यासमोरील गाडीपार्किंगच्या जागेत अनधिकृत रित्या गजरे विक्रेते वास्तव्य तसेच सर्व विधी त्यापरिसरात करत असल्याने नागरिकांमध्ये संताप असून, या संदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका कु. रुचिता लोंढे यांनी केली आहे.
अनधिकृत रित्या गजरे विकणारे हे पनवेल महानगरपालिकेचे रहिवासी नसतानाही ते अनधिकृत रित्या इथे राहून परिसर अस्वच्छ करत आहेत. सुरुवातीला काही प्रमाणात असणारी हि लोक आता १५० च्या घरात गेलेली आहेत. वेळीच जर याला आळा घातला नाही तर इथली संख्या सुध्दा वाढेल व त्यांना काढून टाकणे नामुश्कील होईल. असे नगरसेविका रुचिता लोंढे यांनी नुकतेच महासभेत सांगितले व यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.