कामोठे शहरातील कचरा उचलणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्याची शिवसेनेची मागणी
कामोठे शहरातील कचरा उचलणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी शिवसेनेने पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे.
शिवसेना कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख संतोष गोळे यांनी पनवेल महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामोठे वसाहतीमध्ये कचऱ्याची समस्या वाढत चालली असून सदर कचरा उचलण्यासाठी असणाऱ्या वाहनांची संख्या कमी असल्याने कचरा रस्त्यावरच पडून राहतो त्यातूनच रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी पनवेल महानगरपालिकेने तातडीने कचरा उचलणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी व कचरामुक्त कामोठे करावे अशी मागणी विभागप्रमुख संतोष गोळे यांनी केली आहे.