छत्रपती संभाजी महाराज जयंती नियोजन बैठक संपन्न
पनवेल /रायगड
महाराष्ट्राचे आराध्य असणाऱ्या देवाचे चिरंजीव,ज्यांना शिवरायांचा छावा म्हणून देखील संबोधल जातं असे युगधुरंदर महाराज म्हणजेच छत्रपती संभाजी राजे भोसले होय.छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
रायगड जिल्ह्यात अनेक वर्षापासून मा.विनोदसाहेब साबळे यांच्या मार्गदर्शनात धर्मवीर जयंती साजरी केली जाते.
१४ मे २०२२ रोजी भव्य दिव्य स्वरूपाची जयंती पनवेल(करंजाडे)येथे साजरा करण्याचा संकल्प केला.
शिवपुत्र शंभूराजे यांच्या जयंतीसाठी पहिली नियोजन बैठक मातोश्री निवास,करंजाडे येथे पार पडली.विविध सामाजिक संस्थेचे मान्यवर या बैठकीत उपस्थित झाले होते. जयंतीच स्वरूप कसे असावे यावर चर्चा करण्यात आली.भव्य दिव्य शोभायात्रा आणि इतर चर्चा झाली.शिवराय मनामनात शंभुराजे घराघरात त्याचप्रमाणे महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प केला.
करंजाडे आणि पनवेल शहरातील तरुण एकत्र येऊन सर्वसमावेशक धोरण आत्मसात करून १४ मे २०२२ रोजी शिवपुत्र शंभूराजे यांची शिवजयंती साजरी करण्यात येत आहे अशी माहिती श्री.विनोद साहेब साबळे यांनी दिली.
या बैठकीसाठी विनोद साबळे ,गणेश कडू ,कमलाकर लबडे , दिनेश मांडवकर , मनोज पवार ,सचिन भगत ,रामेश्वर आंग्रे , संतोष विखारे , भरत साबळे ,अनुराग लेकुरवाळे सर ,अतिश साबळे ,सागर कदम , बंटी प्रबळकर ,सूरज शेलार ,गणेश मोरे ,अमोल देशमुख ,रोहित म्हामळे इत्यादी पनवेल तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
तसेच करंजाडे शहरातील श्री.स्वप्निल मोरे, श्री.नवनाथ दाते,श्री.योगेश नेहरकर,श्री.सुशांत पवार,श्री.बाबासाहेब भोसले,श्री. प्रविण गोरडे,श्री.संदिप लामखडे,श्री.बाळू झोरे,श्री.प्रथमेश पुंडे इत्यादी तरुण मराठा बांधव उपस्थित होते