माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उरण शहरातील मच्छी मार्केट व भाजी मार्केट इमारतीच्या बांधकामासाठी आणखीन तीन कोटी निधीची मागणी”
उरण दि ११ शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून उरण शहरातील मच्छी मार्केट व भाजी मार्केट इमारतीच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय क्र.नपावै-२०२१/प्र.क्र.२०१(३)/नवि-१६ ०३ नोव्हेंबर २०२१ रोजी नगरविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
उरण शहरातील सदर मच्छीमार्केट व भाजीमार्केट इमारतीच्या बांधकामासाठी हा एक कोटींचा निधी कमी पडत असल्याने आज बुधवार दिनाकं ११ मे २०२२ रोजी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नगरविकास मंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आणखीन तीन कोटी निधीची मागणी केली आहे, तसेच सदर कामाचे लवकरच भूमिपूजन मा.मंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे.शिवसेनेच्या माध्यमातून हा निधी मिळाल्याने नागरिकांना उत्तम सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.