बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी लावली विविध कार्यक्रमांना उपस्थिती
पनवेल, दि.16 ः बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज पनवेल परिसरातील विवि कार्यक्रमांना उपस्थिती लावून त्यात सहभाग घेतला होता.
यानिमित्ताने आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथील आयोजित कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. त्याचप्रमाणे करंजाडे बौद्धवाडा व वडघर बौद्धवाडा येथे आयोजित असलेल्या बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. तसेच गणेशनगर करंजाडे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीला सुद्धा उपस्थिती दर्शवून त्यांना मार्गदर्शन केले.
फोटो ः महेश साळुंखे यांचा सत्कार