तरुण बेपत्ता
पनवेल दि. ११ : कोणास काही एक न सांगता वास्तव्याच्या ठिकाणाहून एक तरुण कोठे तरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिबा हेटा बोरो (वय २६) राहणार कुंडेवहाळ उंची ५.५ फूट, रंग गोरा, केस काळे साधारण, चेहरा गोल, डोळे लहान,दाढी मिशी बारीक, नाक सरळ, उजव्या हाताच्या मनगटावर एस हे इंग्रजी अक्षर गोंधळले आहे. अंगाने सडपातळ असून अंगात काळ्या रंगाची हाफ बनियन व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातली आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी २७४५२३३३ किंवा पोहवा एस.एम. थोरात यांच्याशी संपर्क साधावा
फोटो : बेपत्ताशिबा हेटा बोरो