नांदूर मध्ये वादळी पावसाने शेतक-याचे अतोनात नुसकान
उध्दव विधाते यांचे शेडनेट व ढोबळी मिरचीचे पीक झाले भुईसपाट
तातडीचे मदत देण्याची शेतक-यांची मागणी
आष्टी तालुक्यातील नांदूर येथे झालेल्या वादळी पावसाने शेतक-याचे अतोनात नुकसान झाले असून कित्येकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर कित्येकांच्या बागा भुईसपाट झाल्या .वादळ इतक्या जोराचं होतं की उध्दव राजाराम विधाते यांचे अर्ध्या एकरावरील शेडनेट भुईसपाट झाले असून तोडणीस आलेली ढोबळी मिरचीचे पीक भुईसपाट झाले आहे .काही वेळातच होत्याचे नव्हते झाले .
आष्टी तालुक्यातील नांदूर कुंभेफळ पिंपळा व इतर काही भागांमध्ये दोन दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाला .या वादळी पावसामुळे सर्वात जास्त नुसकान नांदूर गावातील शेतक-यांचे झाले असून कित्येकांच्या घरावरची पत्रे अक्षरशः उडून गेले झाडांचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे .या वादळाने फळबागेचे झाडेही कोसळले आहेत .उद्धव राजाराम विधाते यांनी दहा लाख रुपये खर्चून चार वर्षांपूर्वी शेडनेटची अर्ध्या एकरवर उभारणी केली होती.
5,400 रोपे अर्धा एकरवर लावली होती .प्रत्येक झाडाला
दोन ते अडीच किलो मिरची लागलेली होती. .ढोबळी मिरची ऐन तोडणीस आलेली होती .आजच्या बाजारभावानुसार सात ते साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना झाले असते .मात्र या वादळी पावसाने हे शेडनेट कोसळलं गेलं व अर्ध्या एकरावरील ऐन बहारात आलेलं मीरचीचे पीक भुईसपाट झाले .आतापर्यंत शेडनेटसाठी झालेला खर्च ढोबळी मिरची लागवडीपासून तोडणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असून अचानक आलेल्या अस्मानी संकटाने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे . विक्रीस आलेली ढोबळी मिरची शेडनेट कोसळल्याने व वादळी पावसाने आतोनात नुकसान झाले आहे.
अक्षरशः हे परिस्थिती पाहणाऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आणणारी आहे .त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाने तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे .
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजीम शेख यांनीही या परिस्थितीची पाहणी केली .कृषी साहाय्यक मंदा खराडे कार्यालयीन अधीक्षक घनश्याम सोनवणे कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी नुकसान झालेल्या शेतक-यांची पाहणी करून पंचनामा केला आहे. शासनाने तातडीची मदत दिली तरच शेतकरी पुन्हा उभा राहण्यास मदत होईल.