पनवेल लायन्स तर्फे सोलर दिवे वाटप
पनवेल दि.१३ : पावसाळा अगदी तोंडावर आला आहे व या मोसमामध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः खेड्या पाड्यांत आदिवासी वाड्यांमध्ये तर याचा खुपच परिणाम होतो. या अडचणीवर मात करण्याचा एक छोटासा प्रयत्न पनवेल लायन्स च्यावतीने दुद्रे आदिवासी पाडा येथे सोलर दिवे, सोलर पॅनल सह देऊन करण्यात आला.
लायन्स ऑफ पनवेलच्या माध्यमांतून ला. स्वाती गोडसे व ला. संजय गोडसे (नोडल ऑफिसर ग्लोबल सर्विस टीम) यांच्या तर्फे लायन ऑफ पनवेलने दत्तक घेतलेल्या दुंदरे आदिवासी पाडा येथील घरांमध्ये हे दिवे देण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लब पनवेलचे अध्यक्ष ला. सुयोग पेंडसे, डि. व्हिलेज अडॉपशन कमिटी चेयरमन ला. राजेंद्र महानुभाव, जेष्ठ पत्रकार माधव पाटील, साई पॉवर सिस्टीमचे संतोष मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.