राष्ट्रवादी महिला काँग्रेस खोपोली शहर अध्यक्षपदी पुन्हा सुवर्णा मोरे यांची निवड
खोपोली / प्रतिनिधी – शीतल पाटील
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या खोपोली शहर अध्यक्षपदी पुन्हा सुवर्णा मोरे यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.शुक्रवार दि.१७ जून रोजी सुतारवाडी येथे गीताबागेत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री ना.आदिताई तटकरे,विधानपरिषद आ.अनिकेत तटकरे,महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे,मा.जिल्हाध्यक्षा गीता परलेचा,दिपाली चिंबुळकर,युवती अध्यक्षा सायली दळवी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
खोपोली शहर अध्यक्षपदावर सुवर्णा मोरे मागील तीन वर्षापासून काम करीत असताना सर्व प्रभागात महिलांचे भक्कम संघटन तयार केले आहे.पक्षाच्या आदेशानुसार महिलांसाठी कार्यक्रम,आंदोलने यशस्वी करण्यात सुवर्णा मोरे यांच्यासह महिला पदाधिऱ्यांसह मोठा सहभाग असतो.मोरे यांची पक्षासाठीची तळमळ आणि पक्षबांधणीची दखल दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दखल घेत मोरे यांचे एका कार्यक्रम तोंडभरून कौतुक करीत सुर्वण आलेख उज्वल असल्याचे म्हटले होते.
महिला जिल्हाध्यक्षपदी मा.जि.प.सदस्या उमा मुंढे यांची निवड झाल्यावर महिला पदाधिकाऱ्यांंची फेरनिवड करण्यात आली.सुवर्णा मोरे गेल्या तीन वर्षापासून महिला शहर अध्यक्ष पदावर काम करीत असताना झालेल्या निवडणुका,आंदोलने,महिलांसाठी विविध उपक्रम रबवित असल्याची दखल पक्षसंघटनेने घेत पुन्हा महिल शहर अध्यक्षपदी मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.
पक्ष संघटना बांधणीसाठी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तात्कालिन जिल्हाध्यक्ष गीता पारलेचा,रायगड निरीक्षक रूपाली दाभाडे,मा.नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर,सुमन औसारमल, कर्जत खलापूर युवती संघटक प्रतीक्षा लाड, शहराध्यक्ष मनेष यादव, शहर युवकाध्यक्ष अतुल पाटील, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे सुवर्णा मोरे यांनी सांगत शहर अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल खासदार सुनीलजी तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पालकमंत्री आदीती तटकरे, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, रायगडच्या निरीक्षक रूपाली दाभाडे यांचे अभार व्यक्त केले आहे.