पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार; एक जखमी
पनवेल दि.२४ : पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या दोन ठार व एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पनवेल जवळील जुना मुंबई-पुणे हायवे रस्त्यावर कोकण रेल्वे ब्रिजच्या अंदाजे २०० मीटर पुढे एका मोटार यामाहा सायकलीस त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या कंटेनर चालकाने धडक मारल्याने मोटारसायकलीवर दोघे जण खाली पडले दरम्यान त्याचवेळी दुसऱ्या कंटेनरने मयत आयरिन सुसान जोसेफ वय १९ हिच्या डाव्या मांडीला व पोटाला मागील टायर घासून गेल्याने ती गंभीररित्या जखमी होऊन तिचा मृत्यू झाला आहे तर तिच्या बरोबर असलेल्या गोवर्धन गोपी (वय २२) हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत कोळखे गावाजवळील वेल्वेट ट्रीट गार्डन हॉटेलजवळ असलेल्या महिंद्रा शोरूम समोर एका ट्रेलरने मोटार सायकलीस धडक देऊन झालेल्या अपघातात मोटार सायकलीवरील राजीव पेडणेकर (वय ४२, राहणार कामोठे) हा गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.