महिला बेपत्ता
पनवेल दि.२४ : पनवेल जवळील वडघर गाव रमाबाई नगर येथे राहणारी एक विवाहित महिला कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शितल राजेश ठोंबरे (वय २९ )असे या महिलेचे नाव असून उंची ५ फूट १ इंच, केस काळे, रंग गोरा, बांधा मध्यम, चेहरा गोल, नाक बसके असून अंगात पोपटी रंगाचा कुर्ता व सफेद रंगाची सलवार परिधान केली आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा मारुती पवार यांच्याशी संपर्क साधावा
फोटो : शितल ठोंबरे