उरण महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा.
उरण दि 27कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
आभासी ऑनलाइन माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर.एस. कोंडेकर (इतिहास विभाग प्रमुख, राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड जि. नांदेड) हे होते. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवन व कार्य या विषयावर मार्गदर्शन करताना शाहू महाराजांचे आरक्षण धोरण, त्यांची जलनिती, त्यांनी निर्माण केलेली सामाजिक समता, मल्लविद्येला दिलेला आश्रय, बहुजन समाजाचे शिक्षण, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, स्त्री शिक्षण इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व खऱ्या अर्थाने त्यांनी स्वराज्य निर्माण केल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एन.गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज हे दृष्टे राज्यकर्ते असून देशाच्या उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभाग प्रमुख प्रा. ए.के गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर एम.जी लोणे यांनी तर आभार आय,क्यू ए.सी समन्वय प्रा. डॉ.ए.आर. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.