एटीएम कार्ड चा गैरवापर करून काढले ५७ हजार रुपये
पनवेल दि २७ : एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड चे क्लोनिंग करून क्लोन केलेल्या एटीएम कार्ड च्या साहाय्याने बँकेच्या खात्यातून ५७, ५२३ रुपये एवढी रक्कम लबाडीने काढून घेतल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे.
हनुमंत काळभोर (वय ६६) यांचे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड चे क्लोनिंग करून क्लोन केलेल्या एटीएम कार्ड च्या साहाय्याने बँकेच्या खात्यातून ५७, ५२३ रुपये एवढी रक्कम लबाडीने अज्ञात इसमाने काढून घेतल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे