जेजुरी येथे लोकशाही मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडून वारकरी संप्रदायात पन्नास हजाराची बिस्किट वाटप
पनवेल/प्रतिनिधी
दिनांक:-२७ वार सोमवार रोजी विठुरायाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून नव्हे परदेशातून पंढरपूरला जाण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय टाळमृदुंगाच्या जयघोषामध्ये तल्लीन होऊन पंढरपूरला जात आहे अशातच लोकशाही मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी स्वखर्चातून पन्नास हजार रुपयाचे दिंडीत सहभागी झालेल्यांना जेजूरी येथे बिस्किट वाटप केले. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्य सचिव संग्राम पाटील व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयश्री सोनवणे होत्या. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये या सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी सुद्धा विठ्ठलाचे स्मरण केले असेच उपक्रम लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राबवण्यात येतील असे प्रसार माध्यमाशी बोलताना अमोल पाटील यांनी सांगितले*