महिला वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजबून घडविले माणुसकीचे दर्शन
पनवेल/प्रतिनिधी :– पनवेल शहरातील उरण नाका येथे पावसाळामुळे एक भाला मोठा खड्डा पडला होता. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांना अडथळा होऊन मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी व महिला पोलिसांनी रस्त्यावरील खड्डे नुसते पाहत न बसता ते बुजविण्याचे कष्ट घेतले. स्वतः कर्मचाऱयांनी खड्ड्यांत खडी टाकून त्यांनी ते बुजविले. यांच्या प्रयत्नामुळे आता वाहतूक कोंडीला आळा बसला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असलेले खड्डे बुजबून घडविले माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
पनवेल शहरातील पनवेल-उरण च्या मुख्य रस्त्यावर उरण नाका येथे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ देखील सुरू असते. याच रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठा खड्डा पडला होता. परिणामी मंगळवारी सकाळपासून वाहनांच्या रांगाच-रांग लागल्या होत्या. यावेळी प्रवाशांनी पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्याकडे याविषयी तक्रार केली होती. यावेळी वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. यावेळी उरण नाका ते टपालनाका येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस हवालदार ए.एस.भोईर, महिला वाहतूक पोलीस वैशाली कोकाटे, कांचन जाधव हे सकाळपासून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु उपाय काय करावा, हे काही सुचत नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोईर, कोकाटे व जाधव यांनी याठिकाणी खड्डे स्वतः बुजविले आणि वाहतुकीतील बराचसा अडथळा दूर झाला. यावेळी प्रवाशांचे होणारे हाल व तसेच पावसाळी हवामान यामुळे काही प्रमाणात पोलिसांनी केलेल्या श्रमदानामुळे प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. पोलिसांनी खड्डे बुजवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. सदर जीवघेणे खड्डे बुजविण्यात आल्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. इतकेच नव्हे तर अनुचित घटनेला आळाही घालता आला.